अमेझिंग महाराष्ट्र(भाग १)
महाराष्ट्र भारतातील एक विविधतेने नटलेला प्रदेश आहे.थोर,पराक्रमी आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. शेतकरी,कष्टकऱ्यांची भूमी. मेहनत,कष्ट,पराक्रम आदी गुण या भूमीच्या मातीत पार जुन्या काळापासून रुजलेले. जैवविविधता,कला-क्रीडा,उद्योग-धंदा,संस्कृती,शिक्षण, पर्यटन आणि इतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर गडचिरोली आणि आसपासच्या परिसरात घनदाट जंगल आहे.मराठवाडा मात्र कोरडा भाग आहे. पश्चिम भाग विस्तीर्ण सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे. सह्याद्रीच्या आणखी पश्चिमेस गेल्यास समृद्ध अशी कोकण किनारपट्टी आहे. सह्याद्रीचा कोकणाकडचा भाग सदाहरित जंगलाने वेढलेला आहे. कृष्णा,गोदावरी,नर्मदा,तापी,पूर्णा या काही प्रमुख नद्या आहेत. या नद्यांच्या बऱ्याच उपनद्या आहेत त्यामध्ये कोयना,भीमा,इंद्रायणी,पैनगंगा,वैनगंगा यांचा समावेश आहे.या नद्यांमुळे शेतीस खूप फायदा होतो. महाराष्ट्राच्या इतिहासात बरेच कर्तृत्ववान लोक होऊन गेले.बऱ्याच लोकांचे असामान्य कर्तृत्व हे अजूनही काही लोकांना ज्ञात नाही.सावित्रीब...