पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी माझी कल्पवृक्षाची सावली!

  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी। ― कवी सुरेश भट मराठी- एक समृद्ध भाषा,महाराष्ट्र आणि गोव्याची राजभाषा.भारतात हिंदी आणि बंगाली नंतर तिसरी मुख्य बोलली जाणारी भाषा. जगात मराठी ही पंधराव्या क्रमांकावर आहे आणि ही मराठी माणसांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. लोकांच्या स्थलांतरामुळे मराठी ही जगाच्या आणखी काही भागांमध्ये बोलली जाते. अमृताहूनी गोड आहे आपली मायबोली मराठी. मॉरिशस,इस्रायल मध्येही मराठी प्रामुख्याने बोलली जाते. म्हणूनच आपल्या या अमूल्य ठेव्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे! पुढील पिढ्यांना माय मराठीची ख्याती आणि महती कळावी यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असायला पाहिजे.मराठी संस्कृती जपत तिला जगासमोर आणण्यात आपण तत्परता दाखवली पाहिजे. तरच मराठी नामशेष होण्यापासून वाचू शकते! प्रत्येक भाषेला एक इतिहास असतो त्याच प्रमाणे मराठी देखील एक बरीच जुनी भाषा आहे.मराठीचा उगम हा महाराष्ट्री प्राकृत, सातवाहनांच्या साम्राज्यात वापरल्या जाणाऱ्या भाषेतून झाला आहे.मराठी भाषेला अनेक ...

आपला शेतकरी राजा

इमेज
मागच्या लेखात महाराष्ट्राच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही वाचलत. आता थोडसं जाणून घेऊया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल. महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य आहे. इतर राज्याप्रमाणेच इथेही बहुतेक लोक शेतकरी आहेत. शेती करणे ही काही सोपी गोष्ट नसते. स्वतःतील जीव शेतकरी पिकांमध्ये ओतून त्यांची देखभाल करत असतात,त्यांचे संगोपन करत असतात.घाम गाळून मातीतून सोन्यासारखे पीक पिकवत असतो. स्वतःच्या जीवपेक्षा त्यांना पिकांची जास्त काळजी असते.शेतकऱ्यांसारखे खडतर आयुष्य जगणे हे सामान्य लोकांना शक्य नाही. शेतकऱ्यांच्या रक्तातच मुळी संघर्ष करण्याची,कठोरात कठोर परिस्थितून मार्ग काढण्याची वृत्ती असते.साधं राहणीमान पण उच्च विचारसरणी.  यावरून मला एक गाणं आठवलं- ------------------------------------------------------------- माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी पाजिते रान सारं मायेची वयनी हसत डुलत मोत्याचं पीक येतं गुलाब ,जाई ,जुई ,मोगरा फुलवीतं..... -------------------------------------------------------------- साधी माणस...

अमेझिंग महाराष्ट्र(भाग १)

इमेज
महाराष्ट्र भारतातील एक विविधतेने नटलेला प्रदेश आहे.थोर,पराक्रमी आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. शेतकरी,कष्टकऱ्यांची भूमी. मेहनत,कष्ट,पराक्रम आदी गुण या भूमीच्या मातीत पार जुन्या काळापासून रुजलेले. जैवविविधता,कला-क्रीडा,उद्योग-धंदा,संस्कृती,शिक्षण, पर्यटन आणि इतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राला  ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर गडचिरोली आणि आसपासच्या परिसरात घनदाट जंगल आहे.मराठवाडा मात्र कोरडा भाग आहे. पश्चिम भाग विस्तीर्ण सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे. सह्याद्रीच्या आणखी पश्चिमेस गेल्यास समृद्ध अशी कोकण किनारपट्टी आहे. सह्याद्रीचा कोकणाकडचा भाग सदाहरित जंगलाने वेढलेला आहे. कृष्णा,गोदावरी,नर्मदा,तापी,पूर्णा या काही प्रमुख नद्या आहेत. या नद्यांच्या बऱ्याच उपनद्या आहेत त्यामध्ये कोयना,भीमा,इंद्रायणी,पैनगंगा,वैनगंगा यांचा समावेश आहे.या नद्यांमुळे शेतीस खूप फायदा होतो. महाराष्ट्राच्या इतिहासात बरेच कर्तृत्ववान लोक होऊन गेले.बऱ्याच लोकांचे असामान्य कर्तृत्व हे अजूनही काही लोकांना ज्ञात नाही.सावित्रीब...

साताऱ्याची एक अविस्मरणीय सहल!

इमेज
सातारा हे सह्याद्रीतल्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं शहर. निसर्गाने या जिल्ह्याला खूप काही भरभरून दिलं. मग ते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर,पाचगणी असो वा समर्थ रामदास स्वामी यांची समाधी असलेला सज्जनगड असो,ठोसेघर,वासोटा किल्ला असो किंवा कोयना,कृष्णा या नद्यांचे उगम स्थान असो. कासचे पुष्प पठार हे जैवविविधतेने नटलेले सुंदर ठिकाण. पर्यटक या जिल्ह्याला वर्षभर भेट देत असतात. आम्ही देखील फेब्रुवारी महिन्यात वज्राई धबधबा आणि कास तलाव बघायला जायचं असं ठरवलं. दिवस होता २ फेब्रुवारीचा. पहाटे ३:३०ला उठून सगळ्यांची तयारी सुरू झाली. ५च्या आसपास आम्ही साताऱ्याच्यादिशेने रवाना झालो. सकाळची गुलाबी थंडी मनाला सुखावणारी होती. जिथे नजर जाईल तिथे दाट धुके दिसत होते. खंडाळा येथील खंबाटकी घाटात असताना सूर्योदय होत होता. सूर्याचे ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटत होते.  ८ वाजताच्या सुमारास आम्ही साताऱ्यातील कुरणेश्वर मंदिरात पोहचलो. देवाचं दर्शन घेऊन गरम पोह्यांवर ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो.    रस्त्याच्या एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. त्या दरीतील नद...